STORYMIRROR

Jakruti Dingankar

Drama Tragedy

3  

Jakruti Dingankar

Drama Tragedy

मुजरा अर्पितो मानाचा

मुजरा अर्पितो मानाचा

1 min
180

सह्याद्रीच्या कडेकपारी नाद तोफांचा गुंजला

आई जिजाऊंच्या पोटी वीर शिवछत्रपती जन्मला...


लहानपणीच तलवारबाजी शिकून तर सज्ज केले स्वत:ला 

हर हर महादेवचा जयघोष करून कित्तेक किल्ले जिंकून दिले स्वराज्याला...


जिवापाड जपले यांनी मराठमोळ्या भगव्याला 

शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असा धडा शिकविला खानाला...


आयुष्यभर दुःख सोसुन मात्र सुखी ठेवले रयतेला

मावळ्यांच्या साथीने काबीज करून दाखविले दिल्लीला...


लाभली तुमची पुण्याई आमच्या मराठी भूमीला 

शिवराय म्हणूनच मानाचा मुजरा अर्पितो तुमच्या चरणाला...


        | जय भवानी जय शिवाजी |



Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama