ससा आणि कासवाची शर्यत
ससा आणि कासवाची शर्यत
एक होते जंगल
जिथे राहती चराचर
कासव आणि सशामध्ये
ससा चाले भराभर...१
टाळ्यांच्या गजरात
झाली शर्यत सुरू
कासव चाले मंद
ससा धावे तुरुतुरु ....२
ससा होता चंचल
कासव बिचारे शांत
सशाला गर्व चालीचा
कासवास नसे भ्रांत .....३
मिळून दोघा मित्रांनी
लावली शर्यत धावण्याची
पलिकडे टेकडीवर
झाडापर्यंत पोचण्याची ....४
गाजराचा पाहून मळा
ससा तिथेच थबकला
गाजर,गवत खाऊन
झाडाखाली निजला.....५
हळूहळू का होईना
कासव चाले निरंतर
निजलेला ससा पाहून
हासे गालात धुरंधर ....६
सायंकाळी ससा ऊठला
जोराने धावत सुटला
कासवाला पाहून जिंकलेला
मनातून पार तुटला....७
गोष्ट छोटी डोंगराएवढी
बोध यातून हाच घ्यावा
कासवसुद्धा जिंकू शकते
गर्व कशाचा नसावा....८
