STORYMIRROR

Gaurav Daware

Drama Inspirational Others

3  

Gaurav Daware

Drama Inspirational Others

सोनेरी पहाट

सोनेरी पहाट

1 min
170

अलगत उन्हातून ऊन उगवली 

आज नव्याने पहाट उजळली 

रोपाला नवी पाने फुटली 

आज मला नवी दिशा मिळाली..... 


पक्षाचे थवे किलबिल करती 

आकाशात नवा रंग उधळती 

फुलांना नवा बाहर येती 

आज मला नवी दिशा मिळाली...... 


वाऱ्याचा नवा गंध पसरला 

पाण्याला नवा रंग मिळाला 

पानांवर नवा बहार चढला 

आज मला नवी दिशा मिळाली...... 


चिमण्या नवी गाणी गाती 

सोनेरी पहाट उजळून देती 

फळांनी झाडें भरुनी जाती 

आज मला नवी दिशा मिळाली.....


सोन्याची पहाट फक्त शब्दांचे मोती

त्यापुढे सगळकाही वाहून जाती

थोडी किलबिलाट पक्षी गाती

आज मला नवी दिशा मिळाली.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama