सोनेरी पहाट
सोनेरी पहाट
आभास चांदण्याचे, मुक्त झाल्या तारका.
पायवाटही धूसर धूसर धुंद झाली सारी धरा
लपेटून घेतली दंव बिंदूंनी व्यापल्या दाहीदिशा
मिलनोत्सुक सरिता, भेटण्या सागरा
आकाश धरती एक व्हावी दूर दूर क्षितिज ते टेकले
विवंचना तीच पुन्हा नव्याने घास कसा भरवू मज पिलांना
करता करविता तोच गडे, तोच देई चोच अन तोच भरविल का घासही
स्वप्न म्हणू की, वेडेपणा? की नुसताच असह्य परंतु निष्फळ जगण्याचा अट्टहास हा
झुगारून द्यावेत का हि देहाची लक्तर
हे सारे मायावी पाश
अन व्हावं कि काय पंचतत्त्व विलीन बिनदिक्कत, बिनधास्त
नाही नकोच,माघारी कोण भरविला पिलांना मायेने घास
पुन्हा उगवेलच ना कधीतरी सोनेरी पहाट
