संवेदनशीलता....!
संवेदनशीलता....!
जेंव्हा संवेदनशिलता मरते
तेंव्हा कुसळ दिसू लागते
भावनेच्या स्पर्शालाही
ग्रहण लागलेले दिसते...
अंधत्व इतके येते
की संवेदना धूसर होते
तेंव्हा माणसाचे माणूसपण
सुद्धा लयास जाते....
माणूसपण जेंव्हा लयास जाते
तेंव्हा दानवात रूपांतर होते
मानवाला माणूस म्हणून
जगणं सुद्धा मग नकोसे वाटते...
संवेदना नसेल तर
ते जीवन कसले म्हणायचे
आणि उघड्या डोळ्यांनी
ते पावलो पावली पहायचे...
मला वाटते
संवेदनशीलता जपावी
माणसातल्या माणुसकीची
वृद्धी दिवसेंदिवस होत रहावी ....!!!
