STORYMIRROR

Meena Kilawat

Inspirational Others

3  

Meena Kilawat

Inspirational Others

संस्कृतीच्या पाउलखुणा

संस्कृतीच्या पाउलखुणा

1 min
7.2K


महान आहे संस्कार भारताचे 

जीकडे पहावे तिकडे नांदती 

पराक्रमाचा इतिहास लल्लाटी

वसे संस्कृतीच्या पाउलखुणा..

रुढी-परंपरा-सण-उत्सव उत्कर्ष

घडे सदाचार संतसंगाचा बाना

जन-गण-मनाचा जयघोष सदा

मायभूमिची सहिष्णुता मोठेपणा..

सर्व-धर्म-समभाव सदा इथे राहती

नित्य इतर संप्रदायांची ही वस्ती 

अनेक धर्म-भाषा-बोली विभिन्न

म्हणे वंदेमातरंम् इथे प्रत्येक व्यक्ती..

ग्रंथ-ग्रंथालय-तत्वज्ञान-परीसंवाद

प्राचीन लेण्या-कलाकृती कारागीरी

स्वर्ग दिसे अनुपम अमुुची ही धरती

खाण-पान व्यंजने आहे इथे परोपरी..

होवून गेले इथे महासंत नाना विभूती

सिनेसृष्टीचे कलाकार जीवंत स्वर्गनगरी

भांगडा-गुजराती-महाराष्ट्राची लावनी

तोड नसे कुठे ही गीतगायनात माधुरी..

शूरवीर बलिदान हंसुनी इथे झेली

निधड्या छातीवर गोळ्या देशासाठी

रांत्रदिवस इथे करती साहित्याचे-दान

सोसुन हाल अपेष्ठा कार्य मानासाठी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational