समाज 'एक मोकळा श्वास'
समाज 'एक मोकळा श्वास'
चेकाळलाय समाज, बोकाळलाय समाज
समाजाचे काही नीती नियम असतात म्हणे,
त्या आधारावर तो, माजोरा झालाय समाज
टपून बसलाय छळायल.,
काही वेळा तर समाज म्हणजे, भयंकर असतो
काही वेळेला आपल्याच चुकीवर, हळूच पांघरूण घालतो
मला, मला माहित नव्हते समाजाचे काटेकोर नियम
तेंव्हा नकळत पाऊल हुकल होतं ,
नाही, नाही, चुकलं नव्हतं....हुकल होतं
हुकल यासाठी की समाजबाहेर, रितीबाहेर
तिचं एक एक पाऊल पुढेच सरकत होत,
झुगारले होते तिने, कठोर नियमांचे बंधन
तेच तेच टोमणे आणि तेच तेच लढायचे रणांगण
कठोर शिष्ट मंडळी,चहुबाजूने घेराव,
सोप नव्हतं एवढं सगळं ओलांडून येणें
एक उडी चुकली की काटेरी कुंपणात
खचकन पाय अडकून फाटतो तशी दशा करतात म्हणे
मग जखमा भरेपर्यंत, अगदी कुंपणातच ठेवतो समाज,
डिवचत जातो जखमा, पश्चातापचे अश्रू नाही गळाले तर
दोषी ठरवतो तो समाज
अदृश्य असतो समाज ,जेव्हा गरज असते पाडसाला
उचंबळून येतात काटेकोर नियम अवेळी,
हेरून ठेवतात सावजाला,
याला म्हणे घाबरायचे असते,
चुकीला इकडे माफी नसते
जाऊदे ग ,बंधन फार झालीत ना तुला!
तुही एक समाज काढ, या वृत्ती झुगारायला।
चल हो पुढे ,...सुरू कर ...
तुझ्या निर्भीड अस्तित्वाने ,
या तथाकथित समाजाला छळायला,
तरच मोकळा श्वास मिळेल तुला घ्यायला,
