समाधान!
समाधान!
कर्तव्य बजावताना
मनस्वी समाधान मिळते
जेंव्हा सीमेवर
मातृभूमीचे प्रेम कळते
जिच्या कुशीत वाढलो
जिच्या वात्सल्यात न्हालो
तिचे रक्षण करताना
कृतार्थ होणे भावते
वात्सल्य सिंधू आईच्या
कुशीत झोपता
माय स्पर्श सुखावतो
अंतरी प्रेम भाव जागतो
तुझी सेवा करताना
आई आनंद खरा लाभतो
तुझ्या रक्षणार्थ
देह भान मी हरपतो....!!!
