सलाम सैनिक हो
सलाम सैनिक हो
रक्षण करण्यासाठी
खूप कष्ट घेता तुम्ही
रात्रभर जागतात
शांतीने झोपतो आम्ही
हा सलाम सैनिक हो
तुमच्या या कर्तृत्वाला
हा सलाम सैनिक हो
तुमच्या देशभक्तीला
पूर्ण ताकद लावून
लढता त्या सीमेवर
गरज पडता, गोळी
झेलता या छातीवर
करुन शत्रुचा खात्मा
सुरक्षा देता आम्हाला
करतो वंदन आज
तुमच्या पराक्रमाला
तुमच्यामुळे आजही
आहे तिरंग्याची शान
करतो सलाम आज
वाटतो हा अभिमान
