सकाळचे ऊन
सकाळचे ऊन
मी सकाळचे ऊन, भगवा सुनहरी रंग
मी हिंन्दू नाही .
मी तुमच्या डोक्यावरचे निळे आकाश
सर्वांना देतो शितलता,
मी बोद्ध नाही
मी हिरवा निसर्ग देतो सर्वास सावली
मी मुस्लीम नाहीय.
किती रे तुम्ही शहाणे
मला तुम्ही विभागून टाकले,
पण!
कोणी विचार केलाय का?
मी स्थीरत्व घेऊन जगत नाहीय
ना मी नेहमी भगवा सूर्य असतो,
ना मी निळेच आकाश असतो
ना निसर्गही नेहमी हिरवा असतो.
रंगाची रसमिसाळ सतत होत असते.
आणि निसर्गाचा होतोय
कायापालट
किती ऋतु होते
माहीत आहे ना तुला?
हे मानवा सांग ,
मग माझी तुलना तू
तू पाळत असलेल्या धर्माशी का करतोस?
का?
स्व:ताला मानवच म्हणत नाहीस?
मला नेहमी प्रश्न पडतो?
बस मध्ये शाळेत ,कार्यक्रमात,
अन न जाणे कित्ती ठिकाणी
तू जात विचारून
माणसाचाच अपमान करतोस!
तू कधी रे सुधरशील?
पक्षी संध्याकाळ होताच
घरट्यात शिरते म्हणून तो सुरक्षित असतो.
मानव हव्यासाने पछाडला..
रात्रंदिन कष्ट करतो.
निसर्गाचे नियम तोडतो.
मग तो ही तुला रोगानी विकारांनी ग्रस्त करतो.
मानवा.
मी कधी भगवा, निळा, हिरवा नव्हतोच
ती प्रकृती आहे तू जाणून घे
जात, धर्म, वर्ण, लिंग, वंश, देश राज्य
ह्या सर्व गोष्टी तुझ्या सोयीसाठी
निर्माण केल्यात तू
आणि मानवाने मानवालाच गुलाम केले!
तुझे स्वातंञ्य तुझ्याच हातात आहे.
करुणा वाट, मैञी भाव जागव
ऊठ, बघ सकाळ झाली.
स्व:ला बलवान कर आणि
स्वाभिमानाने जग
