शुक्रवार
शुक्रवार
शुक्रवार हलका फुलका
क्रमाने आला
तेजोमय
मळभ
सरता उगवला
लालबुंद पोळी पुलका.....!
सकाळची न्याहरी गोड
संपवून निघता
सूर्यकिरण
तिरके
गाल चाटता
पहाटे म्हटले सोड
आणि काय आश्चर्य
मिठी सैल
आनंदी
स्वैर
पाखरू मनाचे
उडाले जोमाने परमाश्चर्य
शुक्रवार सुरू झाला
कामाची गडबड
नाहक
पळापळ
उडाली धांदल
पल्ला पार केला...
रोजचे नियमित कर्म
सुरू जाहले
एकदाचे
तेच ते
नको वाटताना
सुद्धा रेटणेच धर्म.....!!