श्रीकृष्ण
श्रीकृष्ण
श्री कृष्णाच्या रूपाने
श्री विष्णू अवतार घेते झाले
द्वापार युगी अष्टमीस
मध्यरात्री करागृहात जन्मा आले ...!
पूर्णविराम विचारांना मिळाला
मती खुंटल्या सारखे झाले
म्हंटले अख्ख्या महाभारताचे
साऱ्या विश्वाने पारायण केले...!
नवीन असे काय त्या
श्री कृष्णाच्या जीवनात मिळणार?
ज्या मुळे वर्तमानाचा आणि
भविष्याचा उध्दार होणार...?
मन शांत झाले, स्थिर झाले
आणि एक एक पदर उलगडले
आणि नवीनच श्रीकृष्ण
जीवनाचे उन्नत दर्शन घडले...!
मी पाहिलेल्या स्वप्नात मला
वास्तवतेचे आकलन वेगळे वाटले
आणि वर्तमान भविष्य याचे
काहीतरी वेगळेच पैलू सोडून गेले...!
प्रश्न मनाला पडला काय घ्यायचे
श्री कृष्णाच्या जीवनातून हे त्यालाच विचारावे
आणि त्याच्या कडूनच त्याचे
जीवन जाणून घ्यावे....!
अर्जुन झाला माझा
शिष्यत्व पत्करून
धरली पाठ मी त्याची
चिकाटी मोठी धरून...!
रौद्र सागरी जीवनाच्या
तरण्यास शिकवितो श्री हरी
ठेविले अनंते तैसेचि रहावे
कसे ते शिकवीता झाला श्रीहरी...!
महान कर्म योगी श्रीहरी कृष्णावतारी
भेटला मला ,हसला आणि म्हणाला
कर्म करी रे सांडूनी फळाची आशा
धर्म पाळता सत्याचा जाईल रे निराशा...!
पटले मला त्याचे आणि जाग आली
उन्नत उज्वल जीवनाची पहाट झाली
तेजोमय अभा फाकुनी रविराजाची
स्वारी सौभाग्य घेऊनि घरी आली...!
वंदन करून रविराजास
जीवनाची पुन्हा सुरुवात झाली
नकारात्मकता सांडता
रोमारोमात कर्मयोगी सकारात्मकता अंगी भिनली..!
उद्धारीले जीवन माझे
स्वप्नी अचानक येऊनि
म्हणावे वाटते मला म्हणुनी
श्रीहरी श्रीहरी मुखी नाम घेऊनि...!!!
