श्री महालक्ष्मी!
श्री महालक्ष्मी!
श्री महालक्ष्मी मंदिर...!!!
आईच्या द्वारी भक्त मंडळी
लगबगीने गोळा झाली सगळी
पहाट पारी प्रथा आगळी
शोभा इथली जगा वेगळी
द्वारी तिष्ठती मना पासुनी
हाती पूजा सामुग्री घेउनी
आस दर्शनाची धरुनी
येती सारे दूर धरुनी
तीचाआधार मनी धरती
तिचे प्रेमाने दर्शन घेती
श्रद्धा त्यांची आई वरती
तीच खरी करती सवरती
प्रसन्न होऊनिया आई आमची
कवेत घेते प्रेमे आलिंगुनी
भक्ता लागी ती एकच शक्ती
सदा विराजे इथे या धरती वरती
मनोभावे काकडा गाऊनी
स्तुती करती मना पासुनी
अभिषेकाची पूजा पाहुनी
तृप्त होती आनंदाने अंतरातुनी
आशीर्वाद कृपेचा मिळता
कृथार्थ जीवन वाटते
अंतःकरण भरुनी तिला पाहता
आनंदाने डोळा पाणी दाटते....!