श्री महालक्ष्मी प्रसन्न.!
श्री महालक्ष्मी प्रसन्न.!
श्री महालक्ष्मी मंदिर...!!!
भल्या पहाटे महालक्ष्मी मंदिरी
हजेरी मी लाविली
थंड गार गार हवेत
महालक्ष्मी मज पावली
दर्शन पहिले वहिले
मजला द्वार उघडता लाभले
प्रसन्न मुखकमल
क्षणात ते फुलले
हास्य वदन सुकोमल मुख
तेजस्वी मी डोळा भरून पाहिले
कृपाळू कनवाळू आई
तूच मज साठी हे मी जाणले
पदर पसरून तुझ्या पुढे
प्रार्थनेस मी असा उभा
पहा जरा तुझ्या लेकरा
पदरी घालुनी सर्व मुभा
आशीर्वादाचा हात शिरावर
अखंडित तुझा असाच असू दे
सदैव तुझ्याच चरणी
मज आई चिरंतन राहू दे......!
