शंभू राजे
शंभू राजे
शिवबाचा पुत्र शुरवीर
नाव त्याचे असे संभाजी,
स्वराज्य रक्षणार्थ शंभूने
लावली प्राणाचीही बाजी.
पुतळाबाई पोटी जन्मला
शिवबाचा खरा तो छावा,
जिंकले गड किल्ले धैर्याने
करुनी युध्द गनिमी कावा.
आईविना पोरका बाळराजा
वाढला आजीच्या पंखाखाली,
जिजाऊने पाजले बाळकडू
पराक्रमांना सुरुवात झाली.
संस्कृत भाषेचे प्रभुत्व
मुखी होती मधूर वाणी,
अशा थोर लढवय्याची
होती येसूबाई पट्टराणी.
रक्तात वीरता ठसलेली
शौर्याची अपार गाथा,
करी स्त्रीयांचा सन्मान
बनला सदैव त्यांचा दाता
चळाचळा कापायचे शत्रू
शंभूच्या फक्त असण्याने,
मुघलांना फुटायचा घाम
संभाजी समोर दिसण्याने.
कैद करूनी शंभूराजाला
बांधले मग साखळदंडाला,
औरंगजेबापुढे नाही झुकला
धर्मांतराच्या त्या षड्:यंत्राला.
स्वराज्य अन् धर्मासाठी
गमावले शंभूने स्व नेत्र,
रक्तातील थेंब नि थेंब
वाहिले राज्याला दिनरात्र.
शरीराचे झाले तुकडे
ना डगमगला हा वाघ,
रयतेच्या मनात बिंबवली
स्वराज्य रक्षणाची जाग.
