शिवाजींचा घाला
शिवाजींचा घाला


शिवाजींचा घाला
शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीला
दिल्लीत औरंगजेब होता चिडलेला
पाठविले मामा शायिस्ताखानाला
पुण्यात हो पाऊण लाख सैन्याला
लाल महलात खान तो घुसला
दोन वर्ष लोटली तळ ठोकला
पुण्याचा मुलूख उध्वस्त केला
शिवरायांनी धाडसी बेत आखला
खानाची त्या खोड मोडण्याला
पाच एप्रिल सोळासे त्रेसष्टला
वऱ्हाडी बनुन एका वरातीला
खान होता गाढ तो झोपलेला
खानाचे पहारेकरी पेंगायला
तोच भगदाड पाडले भिंतीला
ओळखती आपल्या वाडयाला
गुप्तहेराच्या त्या हो खबरीला
अंधारात ताडी तलवारीला
खान समजून वार केला
मुलगा खानाचा तो गेला
वाडा सारा जागा झाला
" सैतान सैतान " खान ओरडला
खिडकितून तो पळू लागला
मुघलावर शिवरायांचा तो घाला
सातच बोटे राहीली त्या खानाला