शिकार
शिकार
वाघोबाची करण्या शिकार
नवाब घोड्यावर स्वार
समवेत पारंगत साथीदार
हाती त्यांच्या भाला धारदार
हत्ती घोड्यास हीन सापडे
चौखूर जीव वाचवण्या धडपडे
करूणता नयनी आली
वाघाचीही शेळी झाली
हत्ती घोडे पायदळात
व्याघ्रास अडकविले चक्रव्यूहात
क्षणात भाला आरपार
व्याघ्राची झाली शिकार
उचलण्यास व्याघ्रकलेवर
हत्ती घोडे क्षितिजावर
उगाच मारू नये फुशारकी
प्रत्येकाचे दिवस येती
जो करी इतरांना पारध
तोच झाला आज गारद