Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sheetal Ishi

Abstract Tragedy Others

4.3  

Sheetal Ishi

Abstract Tragedy Others

सरसर बरस

सरसर बरस

1 min
255


काय सांगू या दुष्काळाची बात 

पोट गेलंय हो दीडवीत आत 

जगण्या तळमळतेय मानवाची जात 

सरसर बरसना पावसा तू बरस .......


कृषकाचे आभाळाकडे डोळे 

चातक गळा काढून बोले 

आता तरी पडू दे तुझ्या अश्रूंचे गोळे

सरसर बरसना पावसा तू बरस........


कृषीवल झाला कर्जाने नागा

भिजवना तू भूमी च्या भेगा 

आता तरी नेसव हिरवळीचा झगा 

सरसर बरसना पावसा तू बरस ...........


ओसाड भूमी करपली दिनकराने

सर्व शृंगार लुटला क्रूरतेने

आता तरी भर ओंजळ तुझ्या कराने 

सरसर बरसना पावसा तू बरस .......


शेतकऱ्याने लावली पहा आस 

त्याच्या गळा दुष्काळाचा फास 

आता तरी बरसण्याच्या कामाला लाग 

सरसर बरसना पावसा तू बरस ........


दाण्या दाण्याची चणचण 

पाण्याच्या थेंबासाठी वणवण 

आता तरी पाझर तूस आणना 

सरसर बरसना पावसा बरस..... 


पशु पक्षांची तगमग पहावेना 

तळमळत प्राण त्यागतायना 

हतबल मालक अश्रु ढाळतोयना 

आता तरी दया तू करना 

सरसर बरसना पावसा तू बरस.......


वाट पाहून बियाणेही सुकले 

तुझ्याविना उमलायचे विसरले 

आता तरी प्राण तू ओत ना 

सरसर बरस ना पावसा तू बरस ..........


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract