Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sheetal Ishi

Abstract Tragedy Others

4.0  

Sheetal Ishi

Abstract Tragedy Others

तुला वजा केल्यावर

तुला वजा केल्यावर

1 min
193


ऑफिस असते नऊला 

लगबग का पहाटे पाचला? 

झोपू दे शांत उठेन आठला

ओरडता कंठ नेहमीच दाटला 

ऑफिसतील फोनचा तुझा दंडक 

मी आहे का तुझा बंधक? 

उशीर होताच वाजतो फोन 

सोबत आहे तुमच्या कोण ? 

घ्या थोडे काही खाऊन 

नाहीतर शुगर होईल डाऊन

वाट पाहते उघडून खिडकीची काच 

चहा नाश्ता बनतो वाचताच पाच 

रोज का असतो माझ्यावर वॉच 

बंद कर कायमचा तुझा हा जाच 

आयुष्यातून करीन तुला वजा 

तेव्हा संपेल ही माझी सजा 

मग असेल सारीच मजा 

मी असेल माझ्या मनाचा राजा 

 बिना त्रासाचा दिवस उजाडला 

आनंद किती हा मनी दाटला 

पण क्षणात विरून कंठ दाटला 

वास्तव डोळ्यासमोर प्रकटला

सकाळी उठून चहा देईल कोण गरम 

डब्यासाठी बांधेल पोळ्या कोण नरम

घरात झाला केवढा पसारा 

आता कळतोय मात्र आयुष्याचा घसारा 

मैत्रिणी मनातली कायमची गमावली 

निस्वार्थपणे माझ्यासाठी कशी जगली? 

नाही कुणी करायला शेअर 

तुझ्याविना नाही करत कोणी केअर 

तुला वजा केल्यावर काही नाही उरले 

जणू काही माझे आयुष्य सरले.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract