Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sheetal Ishi

Abstract Inspirational Children

4.0  

Sheetal Ishi

Abstract Inspirational Children

विक्रम लॅन्डर

विक्रम लॅन्डर

1 min
185


चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर

चंद्रयान तिन निघाले 

त्याच्या यशाकडे जगाचे लक्ष लागले

चंद्रयान तीन च्या लॅन्डरचे नाव विक्रम

भारताचे नाव गाजवण्याचा केला पराक्रम, 

दमला का प्रदक्षिणा करून ,

कशी दिसते पृथ्वी चंद्रावरून? 

खरे सांग, वेग कमी केला कसा? 

चंद्रावर तुला दिसतोय का ससा? 

हळुवार उतरला चंद्रावर, 

ठसा उमटला मानवी हृदयावर, 

पोटातून काढ प्रज्ञान रोवर हळुवार बाहेर, 

चंद्रावरील माहितीचा दे भारताला आहेर

14 दिवस फिरताना लागू नको देऊ धाप 

चंद्रावर उमटव भारतीय राजमुद्रेची छाप

चंद्रावरचे नमुने कर तू गोळा 

चंद्राचा दक्षिण ध्रुव दिसतोय का तुला काळा?

पाण्याचा सापडतोय का अंश ? 

जीवसृष्टीचा वाढेल का तिथे वंश? 

भूकंपाचे बसतात का धक्के

काढ सगळ्या गोष्टींचे अंदाज पक्के

पृथ्वी मातेची राखी आज चंदामामा ला पोहोचली 

सारी जीवसृष्टी आज खुदकन हसली... 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract