गायिका
गायिका
जीवनी सुंदर सुबक
रेखीव नाजूक नाक
नयन काजळी मीन
झाली गायनात लीन
रूप पारंपारिक मनोहर
देही साज शृंगार
हाती तानपुऱ्याची तार
गाई जीवनाचे सार
होई शब्दांचा मिलाप
गाता रागांचा आलाप
गुंफुनी शब्द माला
तल्लीन प्रेक्षक झाला
गाई कृष्ण गुणगान
नाही तीज देह भान
एकरूप झाली तरुणी
समाधी लागली 'श्री'चरणी