नर्तिका
नर्तिका
जीवन जीचे तालबद्ध
प्रत्येक क्षण सूरबद्ध
चालणे बोलणे मोहक
हर एक अदा दाहक
रिझवी सर्वांच्या मना
सादर असे प्रत्येक क्षणा
निरनिराळ्या तिच्या अदा
पाहून सर्व तीजवर फिदा
रुणझुणती पायी चाळ
करती सर्वांस घायाळ
किणकिणती कंगण
प्रेम भाव घाली रिंगण
नर्तनात पारंगत
समरस होई भक्तीगीतात
घेऊन ताल ठेका
बोलता करी शब्दही मुका
नृत्य हा प्राण खरा
गाजवी आसमंत सारा
उपजीविका हीच तिची
प्रचिती येई आत्मआनंदाची