STORYMIRROR

VINAYAK PATIL

Abstract Inspirational Others

3  

VINAYAK PATIL

Abstract Inspirational Others

स्वातंत्र्य

स्वातंत्र्य

1 min
154

निळ्या आकाशी तिरंगा 

आपल्या देशाची शान 

स्मरुया भक्तीभावाने 

जवानांचे बलिदान ||१|| 


दिले बलिदान त्यांनी 

या भारतमातेसाठी 

मिळाले स्वातंत्र्य आम्हा 

कीर्ती ही तयांची मोठी ||२|| 


प्राणापेक्षा प्रिय असे 

आम्हा ही भारतमाता

मातेच्या चरणी आम्ही 

टेकवी आपुला माथा ||३|| 


सीमेवरी लढे वीर 

पर्वा नसती जीवाची 

बलीदानांनी करतो 

रक्षा भारतमातेची ||४|| 


मातेला करू वंदन 

शपथ सारेच घेऊ 

रक्षा करण्या मातेचे 

ऐक्यतेची शक्ती दावू ||५|| 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract