STORYMIRROR

VINAYAK PATIL

Abstract Inspirational Others

3  

VINAYAK PATIL

Abstract Inspirational Others

चंद्रशेखर आझाद

चंद्रशेखर आझाद

1 min
536

काय सांगू काय वर्णु 

महती वीर पुत्राची 

या धरणीचे लेकरू 

कथा तुझ्या जीवनाची ||१|| 


चंद्रशेखर आझाद 

नाव हे तुझे असती 

लढला थोर महान 

पसरली तुझी कीर्ती ||२|| 


भारतीय स्वातंत्र्याचा 

असे तू क्रांतिकारक 

कोळी वय तुझे हे 

ठरले प्रेरणादायक ||३|| 


पोलिसांच्या वेढ्यामध्ये 

तीन गोळ्या झाडूनीया 

मारुनी घेतली गोळी 

देशावर अर्पूनिया ||४|| 


धन्य असा क्रांतिवीर 

धन्य ते चंद्रशेखर 

देशा दिले बलिदान 

होवूनिया मोठा थोर ||५|| 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract