साहित्य सम्राट
साहित्य सम्राट
साहित्य सम्राट
अण्णा भाऊ साठे,
सकल विश्वात
साहित्यिक मोठे!
आजन्म ते कष्ट
लेखणी वैशिष्ट्य,
चळवळीचेही
अंगी हो धारिष्ट्य!
'अमृत', 'आघात',
'माकडीचा माळ',
कथा कादंबऱ्या
'गुलाम', 'गुऱ्हाळ'
'आबी' व 'आवडी'
नवती', 'निखारा',
'रत्ना', 'रानगंगा',
'रानबोका', 'तारा',
'फरारी' व 'चित्रा'
'रूपा' व 'फकिरा,
आहे अण्णांचाच
साहित्य पसारा
'माणूस','मथुरा'
'काड्तूस जिवंत'
एकापेक्षा एक
कथा जातीवंत
'साताऱ्याची तऱ्हा',
'मल्हार मुरळी',
'रक्ताचा तो टिळा'
'वैजयंते', भाळी
'डोंगरची मैना',
'वारणेचा वाघ',
आहेतच अण्णा
चित्रकथा वाघ
'पुढारी मिळाला',
'अकलेची गोष्ट'
लोकनाट्ये सर्व
अण्णांची ती श्रेष्ठ
'चंदन', 'पाझर',
व 'कापऱ्या चोर'
साहित्यिकांमध्ये
अण्णा फार थोर

