स्वातंत्र्याची समरगाथा
स्वातंत्र्याची समरगाथा
जुलमी बेड्या तोडाया
सारे धावुनिया आले
देशा स्वातंत्र्य करण्या
वीर बलिदान झाले ||१||
ज्योत पेटती क्रांतीची
बंड हे सारे पाहिले
वीर बलिदानातून
स्वातंत्र्य असे पाहिले ||२||
स्वातंत्र्याची समरगाथा
या अक्षरांनी लिहिली
शूरवीरांनी स्वातंत्र्या
प्राणांची आहुती दिली ||३||
भारत माते रक्षण्या
शूरवीर हे लढले
प्राणार्पण करूनीया
वीरमरण हे आले ||४||
तिरंगा आज नभात
फडके ताठ मानेने
शूरवीरांच्या त्यागाने
जगतो अभिमानाने ||५||
