क्रांतीकारक बलिदानी
क्रांतीकारक बलिदानी
स्वातंत्र्याची समरगाथा
लिहीली क्रांतीकारकांनी
निढळाच्या घामधारांनी
रक्तरंजित लेखणीनी (१)
इंग्रजांचे वर्चस्व तयां
असह्य होते जाहले
झुगारण्या पारतंत्र्याला
रक्त खवळे नसातले (२)
क्रांतीकारकांनी मशाल
हाती धरली उन्मेषाने
जिंकू किंवा मरु ध्येयाने
स्वातंत्र्यप्राप्ती निश्चयाने (३)
क्रांतीकारक ध्येयवेडे
जहाल परि देशप्रेमी
इंग्रजांची सत्ता मोडणे
मंत्र जपला रोमरोमी (४)
लाविले सुरुंग सत्तेला
पेचात धरे इंग्रजांसी
पाया खचला सत्तेचा
लाभे स्वातंत्र्य भारतासी
