माझा देश महान
माझा देश महान
1 min
268
माझा देश महान
असे आम्हा अभिमान
क्रांतिकारांनी अर्पिले
देशासाठी बलिदान ||१||
स्वातंत्र्याच्या यज्ञामध्ये
अर्पिले हे निजशिर
अशा पवित्र देशात
जन्म घेती सारे वीर ||२||
स्वातंत्र्याचे स्वप्न पाही
हे वीर उभे ठाकले
गुलामगिरी मुक्तण्या
देशाचे पांग फेडले ||३||
चले जावच्या नाऱ्यानी
केला स्वीकार स्वदेशी
माझा देशच महान
हा अभिमान उराशी ||४||
आजच्या या शतकात
हाक विज्ञान तंत्राची
कास धरू साधनांची
किर्ती पसरू देशाची ||५||