श्रावणधारा
श्रावणधारा
आला श्रावण महिना
चहू कडे हिरवळ
हर्ष मनात दाटता
पसरते दरवळ ||१||
रोज चालतो श्रावणी
खेळ ऊन पावसाचा
चाले लपंडाव जणू
रात्र आणि दिवसाचा ||२||
पशू, पक्षी, झाडे, वेली
निळ्या आभाळाच्या खाली
हात मायेचा फिरता
वसुंधरा तृप्त झाली ||३||
येता या श्रावणधारा
थेंब जणू अमृताचे
rong>खडकाला फूटे पान्हा झरे वाहती प्रेमाचे ||४|| मनभावन श्रावणात वाहे भक्तीचाच झरा भक्तीभावे पूजणाचा मिळे आनंद हा खरा ||५|| असा श्रावण महिना हवा हवासा वाटतो होता आगमन त्याचे हर्ष मनात दाटतो ||६|| येता हा श्रावण मास रेलचेल ही सणांची आम्हा सर्वांना लाभली पर्वणी ही आनंदाची ||७||