STORYMIRROR

VINAYAK PATIL

Abstract Others

3  

VINAYAK PATIL

Abstract Others

मैत्री

मैत्री

1 min
158

मैत्रीचे असे

एक नाते विश्वासाचे 

आहे जिवाभावाचे

सुंदर||१||


संकटे आली

नाही सुटली साथ 

खांद्यावरी हात

धीराचा||२||


अनमोल जीवनात

तुझी सोबत लाभली 

मैत्री आपली 

जिवाभावाची||३||


माझ्या मनातील

अचूक जाणे भाव 

घेतला ठाव 

मनाचा||४||


सुंदर नाते 

असे आपल्या मैत्रीचे 

आहे खात्रीचे

अबाधित||५||


अतूट विश्वास

आपल्या नात्यात असे 

मनामध्ये वसे

सदोदित||६||


मैत्री जीवाभावाची

साथ सदा निभावते

आस जागविते 

जगण्याची||७||



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract