Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sheetal Ishi

Others

4.7  

Sheetal Ishi

Others

गेट-टूगेदर

गेट-टूगेदर

1 min
362


सगळाच आहे तारखांचा खेळ

तुझा नी माझा कसा बसेल मेळ ?

जगुया शाळा परत एकवेळ 

मिळून खाऊ शाळेजवळची भेळ 

काढ की जरा वेळ........


पुढे बसण्यासाठी करूया दंगा 

एकमेकांसोबत नाही घ्यायचा पंगा 

नाहीतर वाढायचा जुना तंटा ...

पुन्हा अनुभवायची शाळेची घंटा 

काढ की जरा वेळ......


तेच मित्र, तेच शिक्षक, तेच वर्ग 

पुन्हा एकदा भेटून अनुभवू स्वर्ग 

आठवून साऱ्या बालपणीच्या खोड्या 

परत करूयात का त्यातल्या थोड्या ?

काढ की जरा वेळ....... 


डब्यातून खाऊ लोणचं पोळी 

पुन्हा खायची लिमलेटची गोळी 

गाऊ कवितेच्या चार ओळी 

आठवणींनी भरूया आपली झोळी 

काढ की जरा वेळ......


लावूया सारे पाढयांसाठी सूर 

येईल का हो आठवणींना पूर ?

मन जाईल मग खूप दूर 

बदलेल मग चेहऱ्याचा नूर 

काढ की जरा वेळ........ 


जाऊदे की दिनचर्येला तुझ्या तडा 

खेळूया परत मैदानी क्रीडा

गिरवायचा ना परत जीवनाचा धडा 

ओल्या होतील डोळ्यांच्या कडा 

काढ की जरा वेळ........


मौजमजेची आनंदाची आठवण 

उजळून शिक्षकांची शिकवण 

अंतरंगात करूया आठवणींची साठवण 

करू एकमेकांची जड अंतःकरणाने पाठवण 

काढ की जरा वेळ...... 


एकत्र येऊ गेट-टूगेदरसाठी सर्व

आपणास पाहून होईल शिक्षकांना गर्व

अनूभवायचे ना परत शाळेचे पर्व

काढ की जरा वेळ..........


Rate this content
Log in