चंदेरी सरीता
चंदेरी सरीता
कोण्या एका सांजवेळी
हिमवर्षावाची नांदी झाली
रुप सरिता चंदेरी ल्याली
कशी अलगद स्थिरावली
मोतीची सर्वत्र चादर
दिसे सारे धूसर
सारे झाले अस्तव्यस्त
स्केटर्स् फिरती फारच मस्त
जन दिनचर्येत व्यस्त
नौका विहार झाले ठप्प
बाकी का गप्प गप्प ?
थंडीने गारठले
झाडांनी पर्ण टाकले
ओसाडपणातही फुलले सौंदर्य
निसर्गाचे केवढे औदार्य