STORYMIRROR

Sheetal Ishi

Inspirational Others Children

4  

Sheetal Ishi

Inspirational Others Children

चंद्रयान 3

चंद्रयान 3

1 min
386

14 जुलैला चंद्रयान 3 झाले प्रक्षेपित 

सुखरूप उतरशील चंद्रावर हे सर्वांना अपेक्षित 

नको घाबरूस होईल सारे नीट 

भारतीयांनी लावली शुभेच्छांची तीट


अवतरले सतीश धवन अंतराळ केंद्रापोटी 

मोहिमेचे बजेट झाले 615 कोटी 

अवकाशी पाठवले LVM3-M4 रॉकेटने 

खरे सांग.... पृथ्वीवरून काय नेले पॉकेट ने 


असा काय तू कावराबावरा होतोस?

सोबतीला कुठले उपकरणे नेतोस 

पृथ्वी भोवती मार तू पाच प्रदक्षिणा 

घे झेप मग चंद्रावर उतरण्या 


विक्रम लँडर चंद्रावर उतरवेल हळुवार 

प्रज्ञान रोवर चंद्रावर सर्वत्र होईल प्रसार 

वातावरणातील घटकांचा ऊर्जेचा काढ तू अंदाज 

शशीच्या कक्षेतून पहा पृथ्वीचा साज 


चंद्राला बसतोय का रे भूकंपाचा धक्का?

नीट तपास नी निर्णय दे पक्का 

पृथ्वीसम का चंद्राचा दक्षिण ध्रुव ?

सांगितलेले कर दगड मातीचे संशोधन 

वैज्ञानिक करतील तुझ्या माहितीचे विश्लेषण 


एक चंद्र दिवसाचा तुझा रे कालावधी 

सावकाश उतरण्याची काळजी घे तू आधी 

चंद्राचे गुढ उकलण्याचा तुला रे नाद 

तुझ्या माहितीच्या आधारे देऊ भविष्याला साद


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational