पेटवू क्रांतीची मशाल
पेटवू क्रांतीची मशाल
उठा रे सारे पेटुनी
मशाल घेई क्रांतीची
रक्त जाऊ नये वाया
किंमत जाणू पाण्याची ||१||
सळसळ वाहे रक्त
पिंजले कित्येक युगे
माणुसकी दडपुनी
संभवामी युगे युगे ||२||
आता नाही राहू उगी
लेकरे आम्ही उद्याची
मुखी वाचा फुटताच
वाट दावी कायद्याची ||३||
माणसात न गणती
अशी ही वृत्ती का असे
माणसात माणुसकी
ही कायम तेवतसे ||४||
