*असेही काही*
*असेही काही*
दिवसा ढवळ्या ,सूर्य प्रकाशी
अंधार नसावा, असेही नाही
कुटिल काजळी गर्भकातळी
किरण उजेडी, असेही काही....१
मानवी जीवन, स्वप्न सुखाचे
तडीस जाईल ,असेही नाही
सायासाविन, राज्य भोगती
भाग्यवंत जिव ,असेही काही....२
आदर्श कुटूंब, जोड़ी देखणी
प्रेमीच असती,असेही नाही
विरह आगीच्या, कुडी जळती
नल दमयंती, असेही काही....३
अंधार विसावा,दिप बुडाशी
म्हण प्रचलित, अशीही काही
कवच कुंडले ,राज मुद्रिका
सत्य झाकतील, असेही नाही...४
हेकड पातीची बांधून काती
लढती कोंबडे असेही नाही
धवलगिरीची शाल ओढूनी
डाव साधतील असेही काही...५
असंभवाची शक्य संहिता
खोटीच ठरते असेही नाही
निर्लज्य सावली नाचती गडवे
बिन पेंद्याचे ,असेही काही....६
प्राण प्रियतमा ओली कोरडी
जीवन सरिता,निर्भय नाही
शोधून पाहूया द्वंव्द पल्याडी
अस्तित्व जगाचे,असेही काही...७
