प्रथम पावसा
प्रथम पावसा
1 min
209
*श्रावणातल्या प्रथम पावसा*
*झिम्माड सरींनी बरसुन जा*
*हिरवळलेल्या धरा कांतीला*
*मौक्तिक फुलांनी सजवुन जा*---१
*नवीन नव्हाळी वसू पोटूशी*
*कुस अधमुखी भिजवुन जा*
*प्रतिक्षेतल्या वांझ तरूवर*
*पराग सुपर्ने उगवुनजा*----२
*श्रावणातल्या*------------
*नदी नाले उदास सरोवर*
*दुथडी जलाने भरवुन जा*
*व्याकूळ हरीणी बावरी राधा*
*घनशामा अंगी बिलगुन जा*---३
*श्रावणातल्या*------------
*खेळ फुलझड़ी मस्त रंगीला*
*उन सोनेरी रंगवुन जा*
*इंद्र धनुच्या रंगीत फुलांचे*
*थवे वेलीवर खुलवुन जा*---४
*श्रावणातल्या*-----
*पुष्प वेचण्या फिरती ललना*
*उघाड जरासा फिरवुन जा*
*दही हांडीचा गोविंद सोहळा*
*वाजत गाजत मिरवुन जा*---५
*श्रावणातल्या*--------
