जीवन
जीवन
अनमोल जीवनाचा
करती सदुपयोग
वेळ वाया नको घालू
न करो दुरुपयोग ||१||
जीवन न मिळे पुन्हा
देइ जीवना आकार
असती क्षणभंगुर
कर स्वप्ने ही साकार ||२||
आनंदी सदैव रहा
लुटा जीवनी आनंद
नको रे करु व्यसन
घेई जीवना स्वानंद ||३||
ईश्वराची देन आहे
उपकार मान त्याचे
सांभाळ या जीवनाला
हे जीवन मानवाचे ||४||
