STORYMIRROR

Prashant Shinde

Drama Fantasy

3  

Prashant Shinde

Drama Fantasy

शेवाळ ......!

शेवाळ ......!

1 min
13.9K



शेवाळ भिंतीवरचे

वाटले मज काहीतरी सांगते

ळ च्या शब्दा पायी

भंबेरी माझी जेंव्हा उडते....!


ती वेळ अशी येते

वरचडच मज वाटते

रचना अनेक केल्या पण

चटक ळ ची तशीच अधुरी राहते....!


पुसले त्याने मला आज

काय झाले तुझ्या प्रतिभेस

लंगडी झाली कारे

येता ळ ची वेळ तुझ्या दारास....?


की अहंकार दुखावला तुझा

शब्द तोकडे संपले म्हणुनी

की ळ ने तुझी

फिरकी घेतली म्हणुनी....!


सावरलो मी म्हंटले

शेवाळ्यास बाही सरसावूनी

दिमाख नको दाऊ

माझ्याच भिंतीवरी बसूनी.....!


लाजले हसले गालात

आले थोडे तोऱ्यात

सत्य असते म्हणे खऱ्यात

ळ ची काय बिशाद ती तुझ्या पुढ्यात...?


हसलो मी ही मग

पाहुनी लडिवाळ पणे शेवाळ हसरे

मायाळू शेवाळ माझे ते

म्हणे मज आहे थोडे मी लाजरे.!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama