STORYMIRROR

Bharat Kamble

Children

4  

Bharat Kamble

Children

शाळेत जाऊ द्या ...

शाळेत जाऊ द्या ...

1 min
875

आई - बाबा मजला 

शाळेत जाऊ द्या हो 

आवडत्या शाळेची मज 

भेट घेऊ द्या हो 


खूप दिवस झाले हो 

शाळेची इमारत पाहून 

शाळेच्या मैदानात एकीने 

देशाचेे राष्ट्र गीत गाऊन 


नको हे ऑनलाइन शिक्षण 

मजा मुळी येत नाही 

माझं मन लागेना 

सोबतीला मित्र नाही 


शाळेत कसं हसत-खेळत  

मजेत शिकता येतं 

मोबाईल,संगणकावर शिकणं 

फार कंंटाळवाणे वाटतं 


कधी जातो कोरोना हा 

माझी त्याला विनंती आहे 

तू लवकर गेलास तरचं 

शाळेत जायला मिळणार आहे ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children