हे मानवा...
हे मानवा...


अरे असा कसा रे
वागतो आहेस तू
तुुझी बुध्दी भ्रष्ट होऊन
कुण्या मार्गे चाललास तू
जन्म देणाऱ्या आई बापाला
वृृध्दाश्रमात नेऊन ठेवतोस
आपण मात्र ऐष आरामात
सुुुखी जीवन जगतोस
भाऊ भावाला ओळखेना
भांडायला तयार असतोस
थोड्यास्या इंचभर जागेपायी
भावाशी हातापायी करतोस
नाही ठेवलीस माणुसकी
गुरुजनांचा आदर करत नाहीस
पैैशाच्या मागे लागून
पाहुण्यांची कदर करत नाहीस
तुझ्यापेक्षा रे ... आता
पशू चांगले वाटतात
त्यांना जीव लावणाऱ्यांना
नक्कीचं ओळखत असतात
हे मानवा ... आपण
रिकाम्या हाती आलो आहोत
जीवनात चांंगले रहा
रिकामीचं जाणार आहोत