दीपावली
दीपावली
1 min
927
आली आली दीपावली
पहा सारे आनंदली
सण असे आवडीचा
लगबग सुरु झाली
मोठा आकाश कंदील
लावू उंचच आकाशी
छान रांगोळी अंगणी
फुले तोरण दाराशी
रोषणाई पणत्यांची
आसमंत उजळते
विश्वातील सगळाच
दूर अंधार करते
चवदार, गोडधोड
खाऊ फराळ खमंग
करु दिवाळी साजरी
सा-या नातलगासंग
दीप मनीचा पेटवू
करु मदत सर्वांना
देवू आनंद वंचित,
दीन, अनाथ लोकांना
