धन्यवाद गुरुजी
धन्यवाद गुरुजी
तुम्ही होतात म्हणून
आमचे जीवन घडले
निरागस रिकाम्या डोक्यात
ज्ञानाचे भांडार भरले
होती वर्गात सर्व
जाती-धर्माची मुले
सर्वांना एकत्र बसवून
समानतेचे धडे दिले
गरीब असो की श्रीमंत
सर्वांना सारखेच शिकविले
कच्चा पाया पक्का करून
यशाचे मार्ग दाखविले
तुम्ही दाखविलेेेल्या मार्गावर
चालत आम्ही राहीलो
ज्ञानाची शिदोरी घेऊन
स्वतः लायक झालो
धन्यवाद गुरुजी...
तुमचा मोलाचा वाटा आहे
तुम्ही आम्हा विद्यार्थ्यांचे
भविष्य उज्ज्वल केेले आहे