भारत देश महान
भारत देश महान
देशभक्तीने प्रेरीत होऊन
ऐन तारुण्यात घरदार सोडले
दिले बलिदान देशासाठी
वीर फासावर चढले
स्वातंत्र्य सैनिक वीर जवानांचा
करीतो आम्ही सन्मान
स्मरण करूनी बलिदान तयांचे
गातो सदा गुणगान
त्यांंनी दिलेेल्या स्वातंत्र्यात
जगतो आहोत सारे
भेद सारे विसरूनी
माणूसकीचेे वाहू द्या वारे
मुले, स्रीया, गरिबांना
मनासारखे जगू द्या
आपणही भारतीय आहोत
स्वातंत्र्याचा आनंद घेऊ द्या
स्वातंत्र्य आहे सर्वांसाठी
भीती मनात नसावी
अभिमान असावा भारतीयांना
गर्वाने छाती फुगावी
सर्व आहेत समान येेथे
ना कोणी मोठा लहान
करू साजरे राष्ट्रीय सण
भारत देश महान ...