STORYMIRROR

Bharat Kamble

Children Stories

4  

Bharat Kamble

Children Stories

बालपणीचा पाऊस

बालपणीचा पाऊस

1 min
348

माझ्या बालपणीचा पाऊस  

मला आठवतोय अजून  

ओले चिंब व्हायचो  

रोजच पावसात भिजून  


कागदी होड्या पाण्यात सोडून  

मागे - मागे धावायचो  

नव्हती कशाची फिकीर  

चिखल तुडवित फिरायचो  


नव्हते तेंव्हा कुठेच  

चकाचक गुळगुळीत रस्ते  

एक पाय काढला की  

दुसरा पाय फसते  


घरी गेल्यावर आई  

खूप - खूप रागवायची  

हाती कपडा घेऊन  

ओले डोके पुसायची  


लय मजा यायची  

मित्रासोबत बागडताना  

पावसाळ्यात रमून जातो  

बालपण आठवताना ... 


Rate this content
Log in