कोरोनाची लाट
कोरोनाची लाट
1 min
430
पुन्हा-पुन्हा येतेय फिरुन
महामारी कोरोनाची लाट
कधी होईल त्याचा
पूर्ण नायनाट, पूर्ण नायनाट
मानवी जीवन विस्कळीत केले
लावलीया सारी वाट
ईलाज करण्या दवाखान्यात
पुरत नाहीत खाट
त्रस्त जनता महागाईनेही
चढविलाय पर्वत घाट
अन्नावाचून उपासमार
रिकामे राहतेय ताट
लहान-लहान गोपाळांचे
कसे पुरवावे थाट
जीवन जगणे नकोसे
होऊन बसलेय दाट
लागेना मुळी निदान त्याचे
शोधले जरी पळवाट
कधी उजाडेल पूर्वीचीच
आनंदी पहाट, आनंदी पहाट
