जीवनाचे मोल
जीवनाचे मोल
1 min
381
प्रत्येक जन्मात खूप
पुण्य कमवावे लागते
चौ-याऐंशी लक्ष फे-यातून
मानवी जीवन लाभते
जन्मास येताच मातेस
मातृत्वाचा आनंद होतो
घरातील सान थोर
पूर्णपणे आनंदून जातो
जीवनात सुख दुःख
सर्वांच्याच वाट्याला येते
मात्र कसे जगावे हे
त्याच्याच हाती असते
जीवन जणू आनंदोत्सव
हसत खेळत जगायचे
आणि इतरांना सुद्धा
सुखासुखी जगू द्यायचे
मानवी जीवनाचे मोल
सर्वांना कळायला हवे
पुढील जन्म कोणत्या रुपात
नसते कुणास ठावे ...
