जिणं माझं
जिणं माझं

1 min

429
राहीले नाहीत ते दिवस
घर भरून असायचं
छोट्या छोट्या नातवंडांनी
अंगण फुुलून दिसायचं
जोडीदार होता तेव्हा
कमी नव्हती कशाची
दादला माझा कमावता
होती कृपा भगवंतांची
जोडीदार गेेला सोडून
सर्वकाही बदलून गेले
बायका घेेेऊन मुले
शहरात निघून गेले
फुटकं माझं नशीब
वेळ कशी आली
मुले असूनसुद्धा
एकटीला सोडून गेली
इच्छा उरली नसतानाही
दिवस ढकलत आहेे
जीवावर उदार होऊन
जिणं जगते आहे...