STORYMIRROR

Prashant Shinde

Classics

2  

Prashant Shinde

Classics

शाळा मित्र बाके...

शाळा मित्र बाके...

1 min
1.1K


गावाकडच्या शाळेला पाहून

मुरडत होतो सदा नाक

जुने कौलारू शाळेचे रुपडे

बसण्यास नव्हते तिथे बाक...


गरिबीचे कौतुक नव्हते

की नव्हता श्रीमंतीचा थाट

जो तो तिथला आनंदाने

मिरवायचा असला जरी माठ...


मित्र मैत्रिणी सारे आपले

एकच शाळा एकच भाव

नुसती ऐकावी लागायची

गुरुजींची काव काव...


काळ बदलला, वेळ बदलली

आली शाळेला झळाळी

जेंव्हा शाळेला माझ्या

नवी इमारत मिळाली...


पाट गेले बसण्याचे

आली दिमाखात बाकडी

पडू लागली वेग वेगळी

आपोआप वर्गांची तुकडी..


अ ब क ड तुकड्या झाल्या

हुशार मुलं मुली लांबली

तेंव्हा मात्र माझी गाडी

खरोखरच मनो मनी थांबली...


बाकड्यावरच्या खाऊच्या डब्यात

सारी बोटे एकवटायची

हमरी तुमरी हसती खेळती

शिगेस क्षणात पोहचायची..


पण


मैत्रीची मैत्री बाकड्यावरची

कोरून निशाणी ठेऊ लागली

शाळेची सारीच स्वप्ने

अधोरेखीतच होऊन बसली...


ती शाळा ती मैत्री

आजही ओढ मनास लावते

फिरून फिरून आठवण

मला माझ्या शाळेची येते....!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics