STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Inspirational

4  

Abasaheb Mhaske

Inspirational

सगळ्याच्याच नशिबी नसत रे ...

सगळ्याच्याच नशिबी नसत रे ...

1 min
29K


सगळ्याच्याच नशिबी नसतं रे मनासारखं जगणं 

अन् आयुष्याचा जोडीदार स्वतःहून निवडणं ...

स्त्री कितीही शिकली तरीही उपभोग्य वस्तूच 

पुरुषांच्या इशा-यावर नाचणारी बोलकी बाहुली


तिनं मन मारून जगायचं गप्प गुमान गुलामासारखं 

त्यांच्यालेखी ती असते फक्त आदेश पाळणारी व्यक्ती 

तिलाही असतात , मन, भावना, इच्छा - आकांक्षा...

समानतेच्या फुटकळ गप्पा मारून सोयीस्कर विसरतात ...    


खूप दूर आलेय तरीही तुझाच भास सख्या,

काय जादू केलीस रे तू मीच विसरले मला आता ...

कुठेही अन केंव्हाही .. स्वप्नात का होईना भेटतोस 

का उगाच अजूनही नाहक आठवणीतून छळतोस ....


खूप अवघड असत रे ..असहायता ,घुसमट हे सारं ...

झालं गेलं विसरुन जा म्हण्याइतकं नसत कधीच सोप्प 

इच्छा असो या नसो घरच्यांच्या मर्जीखातरही आम्हाला 

जन्मापासून खूप काही करावीच लागते तडजोड , त्याग समर्पण ..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational