सदाबहार काव्यांजली
सदाबहार काव्यांजली
*संयम*
संकट समयी
संयमाने तोंड द्यावे
धीर धरावे
मनातही
अति कोपता
कार्य लयाला जाते
कलुषित होते
मन
संयमी गुण
अंगी मोलाचा अलंकार
सारासार विचार
जीवनात
वाणीवर नियंत्रण
विचारांती निर्णय घ्यावे
नाते जपावे
संयमाने
अविचारी बुद्धी
नष्ट करते जीवन
विनाशास कारण
असते
